देवगावफाटा : गुगळी धामणगाव येथील माणिक डख हे दुचाकीने सेलू येथून गावाकडे जातांना कुंडी पाटीनजीक अचानक त्यांच्या धवत्या दुचाकीला हरीण येऊन धडकले.या आपघातात हरीण व दुचाकीस्वार दोघेही ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ११ वा. वा.घडली.

           गुगळी धामणगाव येथील माणिक भगवान डख ( वय ५२) हे शेती व्यावसाय करतात.ते मुलांच्या शिक्षणासाठी सेलू येथे राहतात.ते दररोज शेतीसाठी ते गुगळी धामणगाव येथे दुचाकीने ये जा करत असत .ते मंगळवारी दुचाकी क्रं.एम.एच. २२ ए.के.१३९१ ने सेलू येथून गुगळी धामणगाव कडे दुपारी ११ वा.दरम्यान जातांना कुंडी पाटी नजीक एक हरीण त्यांच्या धावत्या दुचाकीवर येऊन आदळले.या आपघातात हरिण ठार झाले.तर माणिक डख हे घटनास्थळी पडून होते.नागरीकांनी माणिक डख यांना सेलू येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.पण डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, पोउपनी अशोक जटाळ,सपोउपनी ग्यानदेव बेंबडे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी पंचनामा केला.त्यानंतर खाजगी रूग्णालयातून माणिक डख यांचा मृतदेह शेवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

       हि घटना धामणगाव येथे समजताच गावावर शोककळा पसरली.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे