औरंगाबाद: पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 25 लाख 73 हजार रूपयांची फसवणूक करणारा आरोपी प्रशांत जयकुमार अचलारे ( 48 , रा . सिध्दीविनायक अपार्टमेंट , वृंदावन कॉलनी , आझादनगर , पुणे ) याला दोन वर्षांची सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली चार हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस . एल . रामटेके यांनी ठोठावली . गारखेडा परिसरातील कामगार योगेश गजानन कऱ्हाळे ( 35 , रा . मनिषा बिल्डींग , शिवशंकर कॉलनी , गारखेडा परिसर ) यांच्या पत्नीची 2017 मध्ये प्रशांत अचलारे उर्फ प्रवीण शिंदे याच्याशी एका अध्यात्मीक व्हाटसअपग्रुपवर ओळख झाली होती . काळे यांना माझी राजकीय नेत्यासोबत उठबस आहे , तुम्हाला पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावून देतो . असे आमिष दाखवत त्यासाठी 50 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले