रत्नागिरी : अखेर तीन ते चार वर्षे रखडलेले रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम सुरू झाले आहे. ठेकेदाराने मागितलेली वाढीव ७ कोटीची रक्कम शासनाने मंजूर केल्यानंतर आण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे ठप्प झालेल्या हायटेक बसस्थानकाचे काम सुरू झाले. ४० फुटिंगपैकी ३८ फुटिंग झाले आहे, उर्वरित २ फुटिंग कामाला सुरवात झाली आहे. एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. त्यामुळे १७ कोटीवर हे हायटेक बसस्थानक गेले आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
रत्नागिरी दौऱ्यावर असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हायटेक बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाला भेट दिली. यावेळी एसटीचे अधिकारी, ठेकेदार आदी उपस्थित होते. काम रखडण्याचे नेमके कारण त्यांनी जाणून घेतले. ठेकेदाराने कोरोना काळातील बंदच्या कालावधित वाढीव निधीची मागणी केली.