जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये : पालम,पो.नि. प्रदीप काकडे

परभणी प्रतिनिधी

पालम शहरासह तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुले पळविण्याच्या व महिलांना उचलून नेण्याच्या घटना घडत असल्याच्या चर्चेला मोठ्या प्रमाणामध्ये उदान आल्याचे दिसून येत आहे पण अशी घटना तालुक्यामध्ये कोणत्याही गावात अशी घटना घडल्याची नोंद अद्यापही पालन पोलीस स्टेशनला नाही पण ग्रामीण भागामध्ये व खास करून जनतेतून या चर्चेला त्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देऊन सांगितल्या जात असल्यामुळे शालेय विद्यार्थी पालक शेतकरी शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे बहुतांशी शेतकरी बांधवांना शेती कामे करण्यासाठी मजूर वर्ग मिळणे कठीण बनत चाललेले आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवून बिनधास्त राहणारा पालक वर्ग सुद्धा या अफवेने धास्तावलेला असून मुलांना शाळेमध्ये पाठवणे सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आलेले आहे त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्तींसहच कुटुंबातील अन्य व्यक्तींना सुद्धा अन्य कुठे जाण्यापासून घरातील मंडळी पाय बंद करत असल्यामुळे चे परिणाम सर्वस्वी दैनंदिन जीवनावर होताना दिसून येत आहेत त्याचबरोबर शेती कामे सुद्धा खुळवण्याच्या मार्गावर आहेत त्याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार प्रश्न काढून व जनतेमधून जनजागृती करून अशा सगळीकडे पसरवण्यात आलेल्या ह्या फक्त अफवा आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये अशा सूचना देऊन जनतेमध्ये धीर देऊन एक प्रकारचे खंबीरत्व निर्माण करून सर्वसामान्यांच्या जीवनावर कसलेही प्रकारचा परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे त्याकरिता सर्व सामान्य जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता काही शंका आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा व सावधानतेने आपली दैनंदिन कामे करावी असे आव्हान पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे  सांगितले