पैठण तहसील कार्यलयात राष्ट्रवादी काँग्रेस सह काँग्रेसचे सरकार विरोधात भव्य निदर्शने
पैठण(विजय चिडे)
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने पैठण तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी, पीकविमा व जनावरांच्या लम्पी आजारा-संदर्भात पैठण येथे तहसील कार्यालया समोर भव्य निदर्शने करून निवेदन देण्यात आले. पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळी,
पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व शेतकरी बांधवांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शासकीय अनुदानापासून औरंगाबाद जिल्ह्यासह वगळण्यात आलेला पैठण तालुका तसेच पिकविमा देखील मागिल तीन वर्षांपासून पैठण तालुक्याला मिळाला नाही. शेजारच्या जिल्ह्यांना पिकविम्याचा लाभ मिळतो पण आपला पैठण तालुकाच का वगळण्यात येतो..? या पिकविमा कंपनीच्या बेजबाबदार धोरणामुळे तसेच राज्यात जनावरांच्या लम्पी आजाराने थैमान घातले असून तालुक्यात लम्पी रोगाची अजूनही लस उपलब्ध नाही, मागील आठवड्यात मुख्यमंत्री महोदयांसह राज्यातील अर्धा डजन मंत्री तालुक्यात आले असतांना देखील त्यांच्या मार्फत अतिवृष्टीच्या अनुदानाविषयी कुठलीही घोषणा अद्याप पर्यंत झालेली नाही..
याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या वतीने भव्य निदर्शने करून मा.तहसीलदार यांना वरील सर्व प्रमुख मागण्यासंदर्भात निवेदन आज देण्यात आले आहे.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे सर्व नेतेमंडळी,सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पैठण चे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे, लोकनेते दत्ता गोर्डे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे,राष्ट्रवादी चे अध्यक्ष श्री आप्पासाहेब निर्मळ, राष्ट्रवादी चे विधानसभा अध्यक्ष डॉ गुलदाद पठाण,शहराध्यक्ष निमेश पटेल, जितू परदेशी,हासनोद्दीन कट्यारे, विध्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष विशाल वाघचौरे,कांचन चाटे,विष्णू बोडखे, भाऊसाहेब पिसे, सुरेश दूबाले,जीवन चौधरी,निवेश भावले,युवराज चावरे,हमीद सर,किशोर दसपुते, शेखर देशमुख,आकाश रावस,सुरेश दूबाले,कल्याण भुकेले आदी शेतकरी उपस्थित होते