एनडीपीएस पथकाकडून नशेच्या गोळ्यांची 'सप्लाय चेन' उद्ध्वस्त

आधी हर्सलजवळ रिक्षा पकडली, नंतर अजिंठ्यात जाऊन टाकला छापा

औरंगाबाद;शहरातील नशेच्या गोळ्यांचा बाजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी एनडीपीएस पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने शुक्रवारी हसूल परिसरात एक रिक्षा पकडून तब्बल २ हजार ३३२ नशेच्या गोळ्या जप्त केल्या. हे पथक केवळ शहरातील नशेच्या गोळ्या विक्रेत्यांवर कारवाई करून थांबले नाही तर या गोळ्या येतात कोठून, याचाही शोध घेतला.पोलिसांनी सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील रेणुकानगरात असलेल्या अड्ड्यावर छापा मारला. त्याठिकाणी १ लाख ७१ हजार ७३० रुपयांच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला.

सिल्लोड तालुक्यातून एका रिक्षाद्वारे शहरात नशेच्या गोळ्या येणार असल्याची माहिती एनडीपीएस पथक प्रमुख हरेश्वर घुगे यांना मिळाली. त्यांनी टीमला घेऊन हर्सल परिसरात सापळा लावला. खबऱ्याने सांगितल्याप्रमाणे रिक्षा (एमएच २० ईएफ ७८५३) ही येताना दिसली. तिला थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे दीड हजार गोळ्या मिळून आल्या. या रिक्षात मीर तौफिक अली उर्फ टोनू पिता मीर मनसब अली, शेख एजाज शेख हिजबरोद्दीन आणि शेख नासेर शेख जमाल हे तिघे मिळून आले. त्यांची गोळ्या सापडल्या. अन्न व औषध चौकशी केली असता त्यांनी अजिंठा प्रशासनाचे निरीक्षक अंजली मिटकर येथील साई मेडिकलचा पत्ता सांगितला. यांनी साई मेडिकलचे मालक शंकर दरम्यान, अजिंठा येथे जाऊन रतनलाल बिंदवाल यांच्या घराची झडती साई मेडिकलची झडती घेतली असता घेतली. त्यावेळी तब्बल १ लाख ७१ पोलिसांना त्याठिकाणी आणखी काही हजार रुपयांचा नशेच्या गोळ्यांचा साठामिळून आला.एनडीपीएस पथक नशेच्या गोळ्यांच्या होलसेल विक्रेत्यापर्यंत पोहचल्यामुळे शहरात नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, सहायक पोलीस आयुक्त विशाल दुमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, औषध निरीक्षक अंजली मिटकर, जीवन जाधव, सहायक फौजदार नसीम खान, पोलीस कर्मचारी विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुभळकर यांनी केली.

चौकट-चौघांना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी.

दरम्यान, रिक्षात पकडण्यात आलेल्या मीर तोफीक अली ऊर्फ टीनू मिर मन्स अली (२६, रा. दिरानगर बायजीपुरा), शेख एजाज शेख हिजबराद्दीन (४८, रा. मिलकार्नर), शेख नासेर शेख जमाल (३५, रा. र गार गल्ली, सिटीचांक) या तिघांसह मेडिकल चालक शंकर रतनलाल दयाल (३३, रा. रेणुकानगर, अजिठा ता. सिल्लोड) या चौघा आरोपी वा ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. सपार्ट या नी दिले आहेत.