तरुणांनी शहराला कचरामुक्त करण्याची घेतली शपथ केंद्र शासनाद्वारे पुकारलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत औरंगाबाद महानगरपालिकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . शहराच्या तरुणांनी मोठ्या संख्येत भाग घेऊन ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ . अभिजित चौधरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी नागरिकांसोबत मिळून स्वच्छ अमृत महोत्सव साजरा करीत आहेत . भारताचे स्वातंत्र्याचे ७५ वे अमृतरुपी वर्ष साजरा करण्यासाठी केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने स्वच्छ अमृत महोत्सव आयोजित केला आहे . या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटीने सप्टेंबर १६ व १७ दोन दिवस स्वच्छतेची लोकसहभाग मोहीम हाती घेतली होती