औरंगाबाद : जायकवाडी पंपगृहातील मॅनहोलमध्ये उंदीर शिरल्यानं स्पार्क होऊन सोमवारी पहाटे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळं जुन्या व नवीन योजनांवरील पाणी उपसा बंद पडल्याचं दिसून आलं. अखेर बायपासद्वारे जुन्या योजनेवरील पाणी उपसा दोन तासांच्या खंडानंतर सुरू करण्यात आला. मात्र, नवीन योजना सुरू करण्यासाठी तब्बल 11 तासांचा वेळ लागला. त्यामुळं शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन ते चार दिवस विस्कळीत होण्याची शक्यता आहे.शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील नदी नाले तुडूंब भरली आहेत. अर्थाततच जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. असं असताना देखील शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. गत आठवड्यात बिडकीनजवळील फरशी फाटा येथे जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तब्बल 30 तास लागले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात जुन्या योजनेवरील पंपातच तांत्रिक बिघाड झाल्याचं आढळलं. आता शहरातील टप्पे सुरळीत होत असतानाच जायकवाडी येथील पंपगृहात सोमवारी पहाटे जुन्या आणि नव्या योजनेवरील वीजपुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळं दोन्ही योजनांवरील पाणी उपसा बंद झाला. नवीन योजनेवरील पंपगृहाच्या मेन पॅनलमध्ये कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. त्यानंतर चार नंबरच्या पंपावरील फीडरमध्ये उंदीर शिरल्यामुळं स्पार्क झाल्याचं दिसून आलं.या ठिकाणी स्पार्क झाल्यामुळं सबस्टेशनवरील ट्रान्सफॉर्मर खराब झालं. कर्मचाऱ्यांनी रात्रीच नवीन जायकवाडी पंपगृहातील सप्लाय बायपासद्वारे जुनी योजना पहाटे 4.20 वाजता सुरू केली. मात्र 56 एमएलडी क्षमतेची जुनी योजना दोन तास 15 मिनिटे बंद होती. दोन्ही योजना बंद असल्यानं सोमवारी शहरातील पाणीपुरवठा अधिक प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं