परभणी:-नुकत्याच पार पडलेल्या 13 वे राज्यस्तरीय डॉज - बॉल अजिंक्यपद स्पर्धा 2022 सब ज्युनियर मुले व मुली या स्पर्धेचे आयोजन चिखली जि. सांगली येथे झाली.कार्यक्रमच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन अध्यक्ष डॉ. वसंत लुंगे, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन परभणी सचिव शहाणे सर, सांगली जिल्हा असोसिएशन सेक्रेटरी प्रा. राजेंद्र कदम व महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन जनरल सेक्रेटरी डॉ.हनुमंत लुंगे याची विशेष उपस्थिती होती.
पहिल्या तीन सामन्यात अमरावती, नांदेड व सिंधुदुर्ग या संघावर परभणी मुलींच्या संघाने उत्कृष्ठ कामगिरी करून विजय मिळवला.बक्षीस वितरण प्रसंगी महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन अध्यक्ष डॉ. वसंत लुंगे, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन उपाध्यक्ष राजेश जाधव, सांगली जिल्हा असोसिएशन सेक्रेटरी प्रो. राजेंद्र कदम महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन जनरल सेक्रेटरी डॉ.हनुमंत लुंगे याची विशेष उपस्थिती होती.
तिसऱ्या क्रमांकाकरिता परभणी विरुद्ध औरंगाबाद सामन्यात पहिल्या फेरीत औरंगाबाद संघ 4 / 1 गुणांनी पुढे होता मात्र दुसऱ्या फेरीत परभणी संघाने चांगली कामगिरी करून 5 / 2 अशी बडत घेऊन दोन्ही संघाचे समान गुण नोंदविले. त्यानंतर या अटीतटीच्या सामन्यामध्ये अंतिम फेरीत परभणी संघाने औरंगाबाद संघाचा 2 / 0 अश्या प्रकारे गुण घेऊन परभणी संघाने तिसरा क्रमांक मिळवला.
परभणी संघातील कर्णधार शिवकन्या काळे व उपकर्णधार गीता माघाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष कामगिरी करून आपल्या संघाला विजयी केले. विजयी झाल्यानंतर जगात जर्मनी आणि भारतात परभणी या घोषणेने सर्व प्रेक्षक, प्रमुख पाहुणे व सर्व जिल्ह्यातील खेळाडूंचे लक्ष वेधीत केले. अंतिम सामन्यात कुमारी पायल असोले हिने उत्कृष्ट कामगिरी केली . या संघात जयश्री असोले, लता घोगरे , रंजना मारकड , वैशाली किरवले , सिद्धीका डासाळकर , क्षितिजा खजिने, संचिती आरकुले , वंशिका अग्रवाल, श्रुती हाडूळे यांचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक म्हणून अक्षय साळवे , शरद पवार व बालाजी कटारे यांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या डॉज बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात शिवकन्या काळे , गीता माघाडे व पायल असोले यांची निवड झाली. या यशाबद्दल एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर डाके महाराज, रामप्रसाद घोडके, बाबासाहेब भाबट, शाळेचे प्राचार्य कार्तिक रत्नाला यांनी यशस्वी खेळाडूंचा सत्कार व मार्गदर्शक शिक्षकाचे कौतुक केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी जीवनात खेळ किती महत्त्वाचा आहे. खेळ का खेळला पाहिजे ? खेळामुळे काय फायदे होतात ? याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.