येलदरी धरण भरल्याने,दहा दरवाज्याने पाण्याचा विसर्ग सुरू 

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील येलदरी धरण हे शंभर टक्के भरले असून काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी सहा दरवाजे उघडण्यात आले होते तर आज दिनांक 19 सप्टेंबर वार सोमवारी रोजी येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नदीकाठी वरील गावांनी सतर्कचा इशारा देण्यात आला आहे