लसीकरणाचे मुलावर झाले दुष्परिणाम...

पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील घटना

पाचोड(विजय चिडे) शासनाकडून वेळोवेळी लहान मुलांसाठी पोलिओ, बीसीजी, कॉलरा, धनुर्वाताचे सह अनेक प्रकारचे लसीकरण केले जाते.या लसीकरणासाठी पैठण तालुक्यातील विहामांडवा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या केकत जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरूवारी (दि.१५)रोजी धनुर्वाताचे लसीकरण आले होते. 

या पथकाकडून करण्यात आलेले लसीकरणामुळे केकत जळगाव येथील पाचवीत शिक्षण घेणारा ओमकार संतोष टेकाळे-(वय१०) या मुलावर लसीकरणाचे मोठे गंभीर दुष्परिणाम झाले असून यामुळे या मुलाची प्रकृती गंभीर असून विहामांडवा येथील पथकाच्या हलगर्जीपणामुळे रिअँक्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे.