शेतक-यांनी जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी प्रशासनाचे अवाहन
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आष्टी (प्रतिनिधी) गेल्या महिना भरापासून महाराष्ट्रात लंपी आपाराने डोके वर काढले आहे.या आजाराने गाय-बैल या प्राण्यांचे मृत्यू होत आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात भरत असलेले सर्व गाय-बैलांचे बाजार बंद केले खरे पण शेतकरी माञ गाई खरेदी विक्री बिनधास्तपणे करत असल्याने या जनावरांचे मरण दारी आणत आहे.आता तरी हा आजार जाई पर्यंत शेतक-यांनी गाई-बैल खरेदी विक्री करू नये असे अवाहन तालुका पशु वैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी केले.
लंपी आजाराने शेजारील नगर जिल्ह्यात डोके वर काढल्याने आष्टी तालुक्यातील 12 गावात या आजाराने शिरकाव केला आहे.त्यावर प्रशासनाने दखल घेतली असून,लंपी आजाराने बाधीत झालेले सर्व जनावरं ठिक झाले आहेत.आष्टी तालुक्यातील कडा, आष्टा, देवळाली,इमनगांव फत्तेवडगांव,डोंगरगण,कासेवाडी, सुर्डी,जामगांव,आष्टी,चिंचेवाडी,टाकळसिंग या १२ गावांत लंपी स्कीन चर्म रोगांचा शिरकाव झाला असुन गाय व म्हैस वर्गाला लागण झाली आहे.या बारा गावातील व इतर या बाधीत गावा परिसरातील जवळपास चाळीस गावातील जनावरांना बुस्टर डोस देण्यात आले असल्याची माहिती डाॅ.ढेरे यांनी दिली. तसेच तालुक्यातील शेतकरी व दुग्ध व्यवसायिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.अहमदनगर जिल्ह्यात बाधित जनावरे असल्याने त्याची धग आष्टी तालुक्यात आली आहे. लसिकरण दररोज केले जात आहे.पशुपालकांनी घाबरून जाऊ नये त्याच बरोबर जिल्ह्या बाहेर जनावरांची ने आण करण्यास बंदी असली तरी शेतकरी ऐकण्यास तयार नाही.तो जनावरांचे मरण स्वत;जाऊन आणत आहे.जर पशुपालकांनी खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती वेगळी दिसेल असेही डाॅ.मंगेश ढेरे यांनी सांगीतले.