परभणी(प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सूचना दिल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उपायुक्त महेश गायकवाड यांनी बोरवंड येथील घनकचरा व्यवस्थापन कल्पाच्या कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाचे प्रमुख मिर्झा तन्वीर बेग व गुत्तेदार यांना दिले. कंत्राटदारामार्फतचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छ अमृत महोत्सव मोहीम राबवण्यात बाबत कर्मचार्‍यांना आदेशीत करण्यात आले. तसेच गायकवाड यांनी कंत्राटदारास सूचना दिल्या.