औरंगाबाद :- दि.१९स.(दीपक परेराव) राज्याचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे २ दिवस औरंगाबाद शहरात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र नागरे व सचिव श्याम पलाये,व कोष्याध्यक्ष सचिन उबाळे सह सहकारी संघटनेचे सर्व सहकारी ही उपस्थीत राहून दि. १६ सप्टेंबर रोजी सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे भेटुन व सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने पत्रकारांची व वृत्तपत्रातील छायाचित्रकारांची स्व :त ची हक्काची घरे व्हावी ,स्वस्त व सवलतीच्या दरात म्हाडा ची किंवा एखादया शासकीय जागेवर विकसित करुन देणे बाबत, छायाचित्रकार यांना ,अल्प उत्पन्न दरात घरे मिळावी तसेच छायाचित्रकार व पत्रकार यांना बॅके कडुन कमी मानधन असल्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात बॅंकेत टाळाटाळ केली जाते, आम्ही इमाने इतबारे ने दिलेल्या हप्त्याची परतफेड करु.आमच्या पाल्यांच्या 10वी 12 उच्च शिक्षणासाठी लाखोंचा खर्च हा आम्हाला झेपत नाही, ईच्छा असतांनाही आमच्या पाल्यांना शिक्षणासाठी खुपचं त्रास सहन करावा लागत असल्याने , छायाचित्रकार यांच्या पाल्यांना मोफत किंवा सवलती देण्यात याव्या , जेणे करुन त्यांचे भविष्य उज्ज्वल घडेल ,व देश हितासाठी चांगले सहकार्य लाभेल, छायाचित्र कार यांना विमा संरक्षण मिळावे.

अॅक्रेडेशन ,कार्ड साठी च्या कोट्यात वाढ करावी व जाचक असलेल्या नियम अटी सुलभ कराव्या , पत्रकार व छायाचित्र कार यांच्या वर होणारे हल्ले , व अत्याचार, मारहाण, धमकावणे, जीवे मारायची धमकी देणे , कॅमेरा चे नुकसान करणारे , विरूद्ध संंर्दभात प्रकरणात योग्य ते गुन्हयाची नोंद करून , टाळाटाळ न करता , तात्काळ संबंधितावर पत्रकार अॅक्ट कलमान्वये कारवाई व्हावी , वरील सर्व मागण्या ची दखल घेऊन तात्काळ मंजुरी देण्यात यावी करीता निवेदन देण्यात आले. " या आधी सुद्धा मुख्यमंत्री यांना औरंगाबाद दौऱ्यात दि ३१ जुलै व दि.२ ऑगस्टला स्पिड पोस्टाने ही निवेदन दिले होते " चौथा स्तंभ असणारे पत्रकार व छायाचित्र कार यांचे यांचे अनेक प्रश्न आहेत ते आपण मार्गी लावण्यासाठी योग्य असे सहकार्य आपण नक्कीच करणार ही अपेक्षा ,व मनापासून नम्रतेची विनंती मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांना केली.