शासकीय विश्रामगृह येथे दीडशे युवकांचा शिवसेननेत जाहीर प्रवेश
हिंगोली जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळताच विनायक भिसे यांनी जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कळमनुरीत आज 150 युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या मध्ये मुस्लिम तरुणांची संख्या लक्षणीय आहे हे विशेष.
हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेनेत प्रचंड मोठ्या संख्येने इन कमिंग सुरु आहे. ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने शिवबंधन बांधत प्रवेश करीत आहेत. कळमनुरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत 150 युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. कलमनुरीचे बाळू पाटील यांच्या माध्यमातून हा प्रवेश पार पडला. या युवकांमध्ये मुस्लिम तरुणांचा मोठ्या प्रमाणात समवेश आहे. यामध्ये शेख आवेस, कादर बागवान, माजेद खान पठान, मोहम्मद बागवान, कादर पठान, शेख अन्सार शेख शोएब, शेख इरफान आमेर पठान, शेख शहेबाज, शेख आवेस,माजेद पठान, अरबाज पठान, शप्पा पटेल, वाजेद पठान, शेख अदिल
शेख परवेज, पठान शेख नसीर, इद्रीस बागवान, खाजा पठान, शेख पाशा, शेख अजीम यांचा प्रमुख समावेश होता. या प्रवेश सोहळ्याला अजित मगर, तालुका प्रमुख सखाराम उबाळे, बंडू पाटील, बाळू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. तरुणांनी उद्धव ठाकरे साहेबांचे विचार आणि पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन या वेळी जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी केले.