जांबराजापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा उपोषणास पाठिंबा

औंढा नागनाथः- औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतरही ग्रामपंचायत रुजू करून घेत नसल्याने तालुक्यातील जांब राजापूर ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने औंढा पंचायत समिती समोर १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.तालुक्यातील जांब राजापूर येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी अशोक भालेराव हे २०११पासून कार्यरत होते. परंतु त्यानंतर ग्रामपंचायतने त्यांना कामावरून कमी केले. त्यांनी औद्योगिक न्यायालय जालना येथे तक्रार केली. यात औद्योगिक न्यायालयाने त्यांना कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याउपरही ग्रामपंचायतकडून कामावर घेतले जात नसल्याने अशोक भालेराव यांनी औंढा पंचायत समितीसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत सेवा नियमित करत नाहीत व सेवेचे संपूर्ण लाभ देत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा भालेराव यांनी घेतला आहे.अशोक भालेराव यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 45 /11 ने जाहीर पाठिंबा दिला आहे. जाहीर पाठिंबा देत असताना उपोषणा स्थळी जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुरेश खंदारे, जिल्हा सचिव नागसेन खंदारे ,जिल्हा मार्गदर्शक भारत धवसे,जिल्हा महिला उपाध्यक्ष छाया ठाकरे, वसमत महिला तालुकाध्यक्ष संगीता मस्के, औंढा तालुकाध्यक्ष नामदेव मस्के, वसमत तालुकाध्यक्ष बालाजी साखरे, तालुकाध्यक्ष दिलीप मस्के, औंढा तालुका उपाध्यक्ष सोपान नेव्हल यांच्या सह हिंगोली जिल्ह्यामधील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 45 /11 चे सर्व सदस्य