ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणास रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांची भेट

 औंढा नागनाथ तालुक्यातील जाम राजापूर येथील अशोक भालेराव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात रुजू करून घेत नसल्याने ग्रामपंचायत विरोधात 17 सप्टेंबर पासूनऔंढा पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले असून दुसरा दिवस रविवारी दुपारी रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी सदरील उपोषण स्थळे भेट दिली, यावेळी ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,2011 पासून सदरील कर्मचारी पाणीपुरवठा विभागावर कार्यरत होते परंतु मध्यंतरी ग्रामपंचायतने त्यांना कामावरून कमी केले यानंतर त्यांनी औद्योगिक कोर्टात धाव घेतली यात कोर्टानेही सदरील कर्मचाऱ्यावर कामावर घेण्याचे निर्देश दिले परंतु कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कामावर घेत नसल्याने त्यांनी उपोषण सुरू केले आहे याबाबत रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी या उपोषण स्थळी भेट देऊन प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन मागण्या पूर्ण करत उपोषण सोडण्याची मागणी केली यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते