पैठणः नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून तब्बल 94 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणा खालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग वाढविल्यास नदीकाठच्या गावांना स्थलांतराची वेळ येऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. धरणाच्या आपत्कालीन दरावाजासह सर्व 27 दरवाजे चार फुटांनी उचलण्यात आलीत. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. पाण्याची आवक वाढत राहिल्यास पैठण शहर पाण्याखाली जाऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 3 हजार क्सुसेकने, निळवंडे धरणातून 7 हजार क्सुसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 32 हजार क्सुसेकने गोदावरी नदीत पाणी सुरू आहे. तर मुळा धरणातून मुळा नदीत 10 हजार क्सुसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पुण्यातील घोड धरणातून १६ हजार क्सुसेकने पाण्याची विसर्ग सुरू आहे