अनेकांच्या पक्षप्रवेशाने कार्यकर्ता मेळावा संपन्न.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
बीड (प्रतिनिधी) राज्यात सत्तेचे राजकारण करावयाचे असेल तर गाव गाड्या पासूनच्या प्रस्थापितांची घराणेशाही मोडीत काढून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निर्णायक प्रक्रियेत अग्रस्थानी असले पाहिजे.तरच येथील ओबीसी,मायक्रो ओबीसी तसेच अल्पसंख्यांक भटके विमुक्तांचे कृतिशील प्रतिनिधी निवडले जातील परिणामी वर्षानुवर्ष नाकारल्या गेलेल्या राजकीय सत्तेचे खऱ्या अर्थाने सामाजिकीकरण होऊन सत्ता हस्तगत करण्यास मदत होईल.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केले.
त्या येथील हॉटेल गोल्डन चॉईस येथे आयोजित जिल्हास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या ,पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,वंचित बहुजन आघाडी पक्षाची संघटनात्मक बांधणी करत असताना राज्य,जिल्हा , तालुका कार्यकारणीस सामूहिक निर्णय प्रक्रियेतुन विशेष अधिकार दिलेले आहेत.पक्ष संहिते विरोधात कार्य करणाऱ्यांच्या तक्रारी आल्यास त्यांचेवर कडक निर्बंध घातले जातील असे ही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, बीड जिल्हा प्रभारी किसन चव्हाण,लातूरच्या जिल्हाध्यक्षा निंबाळकर ताई,विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे,तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष विष्णू जाधव,वंचित चे जेष्ठ नेते विष्णू देवकते,जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे,शैलेश कांबळे,भगवंत वायबसे,अक्षय भुंबे उपस्थित होते.
अभ्यासपूर्ण मांडणीतून राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी प्रस्थापित भाजपा सरकारनं दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी भूमिहीन योजनेतून एकाही लाभार्थ्यास अद्याप गायरान जमिनीचे वाटप केलेले नसून बाबा रामदेव यांच्या प्रकल्पास मात्र शेकडो एकर जमिनीची खिरापत वाटली असा आरोप केला. अनुसूचित जातींच्या मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार नमिता मुंदडा यांनी जिल्ह्यात घडलेल्या पारधी हत्याकांडाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून चकार शब्दही न काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
प्रमाणिक व प्रचंड मेहनतीने जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत परिवर्तन सहज शक्य असल्याचं मत बीड जिल्हा प्रभारी किसन चव्हाण यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्तावीक जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांनी केले. तर कार्यकर्ता मेळावा यशस्वीतेसाठी बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक धम्मानंद साळवे, डाॅ.गणेश खेमाडे,संतोष जोगदंड,मेजर अनुरथ वीर,पुरुषोत्तम वीर, ज्ञानेश्वर कवठेकर,शेख युनूस,बबनराव वडमारे,अजय सरवदे, बालाजी जगतकर,अंकुश जाधव,भारत तांगडे,सुदेश पोतदार, भीमराव चव्हाण, सेवानिवृत्त तहसीलदार अनंतराव सरवदे,सोनाजी सोनवणे,दगडू गायकवाड,पुष्पाताई तुरुकमारे महिला जिल्हाध्यक्षा अनिताताई चक्रे, बीड तालुकाध्यक्ष किरण वाघमारे,शहराध्यक्ष लखन जोगदंड यांनी अथक परिश्रम घेतले.