पंजाब: मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाल्याने बदनामी झाल्यानंतर वसतिगृहातील 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असुन हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा विद्यापीठात मोठा गोंधळ झाला असुन परिस्थिती अनियंत्रित झाली होती.पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रात्री अडीचच्या सुमारास अनेक मुलींनी इथं पोहोचून निदर्शनं केली. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना 60 विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. ही विद्यार्थिनी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवत होती आणि तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा. या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आलीय. यावेळी विद्यापीठाच्या गेट क्रमांक 2 वर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला शेकडो विद्यार्थ्यांनी इथं जमून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिस आल्यानंतर व कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थिनी शांत झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे.

सध्या आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटली असून वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनानं इतर विद्यार्थिनींसमोर तिची चौकशी केली. विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत विद्यार्थिनीनं सांगितलं की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमलाचा ​​रहिवासी आहे. मात्र, अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल किंवा अटक करण्यात आलेली नाहीय. दरम्यान, 60 विद्यार्थिनींचे एमएमएस बनवून इंटरनेटवर अपलोड करण्यात आले. या घटनेमुळं वसतिगृहात राहणाऱ्या 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. माहितीनुसार, यातील एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.