आमदार लक्ष्मण पवार हे प्रत्येक कामाचा व्यक्तिशः पाठपुरावा करणारे ध्येयवेडे नेतृत्व
मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग व सचिव सामाजिक न्याय यांच्याशी मतदार संघातील कामाबाबत केली सविस्तर चर्चा
गेवराई :- आमदार पवार यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामाबद्दल मंत्रालयामध्ये मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.
फोटो निघाले, बातम्या आल्या आता काम होतराहील असे म्हणून न थांबता लगेच दुसऱ्या दिवशी आमदार पवार यांनी मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग व सचिव सामाजिक न्याय विभाग यांची भेट घेऊन अधिकारी स्तरावरील मतदार संघातील कामांचा पाठपुरावा केला.
गेवराई विधानसभा मतदार संघातील बागपिंपळगाव फाटा-उमापूर-शेवगाव या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचा अनेक वर्षांपासूनचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यतेचा प्रश्न प्रलंबित आहे.तो प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून योग्य प्रस्ताव केंद सरकारकडे सादर झाला पाहिजे यासाठी प्रस्तावासी समंधीत प्रत्येक अधिकाऱ्यांकडे आमदार पवार स्वतः पाठपुरावा करत आहेत.गेवराई शहरातून जाणार बाय पास टू बायपास रस्ता दर्जेदार झाला पाहिजे,किमान 5 वर्षे तरी त्यावर खड्डा पडणार नाही असे सक्त आदेश संमंधीत काम करणाऱ्या एजनशील द्यावेत.तसेश नगर-पुणे-मुंबईला जाण्यासाठी महत्वाचा असलेल्या मुंबई ते विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्गाचे खरवंडी-पाथर्डी ते नगर दरम्यानचे राहिलेले काम तात्काळ करावे या तीनही विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आमदार पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता संतोष शेलार यांची कोकण भवन मुंबई येथे भेट घेतली.
मंत्रालय मुंबई येथे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट देऊन या विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक निधी गेवराई विधानसभा मतदार संघाला मिळावा,तसेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक योजनेचा मतदार संघातील नागरिकांना लाभ कसा देता येईल याबाबत आमदार पवार यांनी सचिवांशी चर्चा केली.
आमदार पवारांची ही काम करण्याची पद्धत पाहता एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तव्याप्रति प्रामाणिक असलेला धेयवेडा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार लक्ष्मण पवारांची सर्वत्र एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे असेच म्हणावे लागेल.