छत्रपती गणेश मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा देशभक्तीपर गायन स्पर्धा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला होता यामध्ये गणेश मंडळाच्या वतीने परीक्षकाच्या मदतीने यामधील स्पर्धेचे परीक्षण करून प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक काढण्यात आले होते आज दिनांक 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून बक्षीस वितरण ठेवण्यात आले होते यामध्ये लहान गट मध्यम गट व मोठा गट याप्रमाणे प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्राचे वाटप गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले या मध्यम गटातून वक्तृत्व स्पर्धेत कुमारी हर्षदा गुट्टे ही द्विती आली असून या विद्यार्थिनीला उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उदगीर शहरचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . यावेळी शिवछत्रपती युवक गणेश मंडळाचे पदाधिकारी व विद्यार्थी तसेच पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.