मराठवाडा मुक्ती संग्रामातील इतिहास प्रसिद्ध आजेगांव या ठिकाणी आज हुतात्मा बहिर्जी हनुमंतराव शिंदे यांना विनम्र अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले आहे. सेनगांव तालुक्यातील आजेगांव या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये निजामा विरोधात मोठा रणसंग्राम घडला होता तर याचवेळी अाजेगांव येथे वापटी येथील शूर जवान हुतात्मा बहिर्जी हनुमंतराव शिंदे यांना बंदुकीची गोळी लागून त्यांना वीरमरण आले होते. त्यामुळे आजेगांव हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील इतिहास प्रसिद्ध गांव असून या ठिकाणी आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण संपन्न झाले आहे.ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सरपंच राणीताई नंदकिशोर काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तसेच हुतात्मा बहिर्जी स्मारक,पशुवैद्यकीय दवाखाना,जिल्हा परिषद शाळा,महाराष्ट्र ग्रामीण बँक,परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह इतर ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. तर शहीद भूमी म्हणून ओळख असलेल्या आजेगांव या ठिकाणी ध्वजारोहणाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं