जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व डॉ.दिपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बीड - सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारी शिस्त त्यांना जीवनात नेहमीच दिशादर्शक ठरते व आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गोष्टीतील शिस्त उपयुक्त ठरते असे मनोगत जिल्हा पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी सैनिकी शाळेतील पालक मेळावा प्रसंगी व्यक्त केले.
सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बीड येथे शनिवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी विद्यार्थी पालक मेळावा व विद्यार्थी पदगृहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ दिपाताई क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब , प्राचार्य डाके एस ए व पालक प्रतिनिधी अशोक जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पाहुण्यांच्या समोर विद्यार्थ्यांनी सैनिकी संचलन, तायक्वांदो प्रात्यक्षिके व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाके एस ए यांनी केले तर जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब व डॉ दिपाताई क्षीरसागर यांनी उपस्थित पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद शिवणीकर, प्रा.रवी झोडगे व डॉ अविनाश बारगजे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ विनोद पवार यांनी केले. संगीत विभागाचे नामदेव साळुंके यांनी बहारदार स्वागतगीत सादर केले.