रत्नागिरी : तालुक्यातील बँक ऑफ इंडिया शाखा जाकादेवी यांच्यामार्फत खालगाव ग्रामपंचायत येथे येथे भ्रष्टाचार मुक्त भारत, विकसित भारत सतर्कता जागरूकता सप्ताह निमित्त बँकेच्या ग्राहकांना उद्बोधक मार्गदर्शन करण्यात आले.

सतर्कता जागरूकता सप्ताह निमित्त बँक ऑफ इंडिया जाकादेवी शाखेमध्ये विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी लिड जिस्ट्रीक मॅनेजर एन.डी.पाटील,जाकादेवी बँके शाखेचे प्रबंधक नारायण सिगोते यांनी ग्राहकाला ग्राहकांना विशेष मार्गदर्शन करताना बँकेच्या ग्राहकांची फसवणूक, आँनलाईन भ्रष्टाचार होण्याचे प्रकार, ग्राहकांना आकर्षित करून कशी आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते याविषयी अनेक घटकांचा उहापोह करून सविस्तर माहिती दिली.

भ्रष्टाचारविरोधी बँकेची व्यापक भूमिका यासंदर्भात बँक ऑफ इंडियाच्या वतीने ग्राहकांना उद्बोधित करण्यात आल्याचने उपस्थित सुमारे १५० ग्राहकांनी बँकेच्या जनजागृती कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून बँकेचे आभार मानले. 

या कार्यक्रमाला खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर यांसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.