परभणी, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.