औरंगाबाद, मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. मुक्तिसंग्रामाच्या देदीप्यमान इतिहासाचे अत्यंत प्रभावी दर्शन या प्रदर्शनातून होत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या सहकार्याने आयोजित हे चार दिवसीय चित्र प्रदर्शन सिद्धार्थ उद्यान परिसरात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वित्त मंत्री डॉ. भागवत कराड, सर्वश्री आमदार संजय शिरसाट, अभिमन्यू पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जीएसटी विभागाचे आयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, आदी उपस्थिरत होते. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या प्रदर्शनास नागरिक, विद्यार्थी, अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन निशुल्क असून मंगळवार, 20 सप्टेंबरपर्यंत सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
2023 Dadasaheb Phalke Awards: "The Kashmir Files," "RRR," and Other Major Wins at International Film Festival. - Newzdaddy
"RRR" Won the International Film of the Year award, and "The Kashmir Files" won the Best Film...
ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಮೇಲೂ ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಪ್ರಭಾವ ಬೀರುತ್ತಿವೆ- ಡಾ. ಬಿ.ಕೆ. ರವಿ
ಬೆಂಗಳೂರು : "ಸಂವಹನದ ಅತ್ಯಂತ ಶಕ್ತಿಯುತ ಅಂಗವಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತಿರುವ 'ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮ'ಗಳು ಇಂದು ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಮೇಲೂ...
NCP में फूट डालकर BJP के साथ जाएंगे अजित पवार? अटकलों पर शरद पवार का आया बयान
महाराष्ट्र विधानसभा में विपक्ष के नेता अजीत पवार की काफी समय से एनसीपी से बगावत की...
प्रधानमंत्री ने 'मन की बात' के जरिए देश को ऐतिहासिक नेतृत्व दिया है: चुघ
भाजपा के राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ ने रविवार को 100 वे मन की कार्यक्रम को श्रीनगर में सुना।...