सवड येथील कै. मीराताई माध्यमिक विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
हिंगोली तालुक्यातील कै मिराताई माध्यमिक विद्यालय व संत गजानन महाराज उच्च माध्यमिक विद्यालय मधील विद्यार्थी यांनी शिक्षण पूर्ण करून आपली यशाचे शिखर गाठले आहे त्यामध्ये लक्ष्मण शंकर बोरकर यांनी महाराष्ट्र सुरक्षा दल मध्ये निवड झाली आहे तर नेपाळमध्ये अंतरराष्ट्रीय धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गोड मेटल व प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्या निमित्ताने 17 सप्टेंबर शनिवार रोजी गावातील सरपंच गजानन थोरात मुख्याध्यापक केके गांजवे प्राध्यापक प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला असून पुढील कार्यास यावेळी त्यांना शुभेच्छा ही देण्यात आले आहे.