ताज्या

शहर

गेम्स

मनोरंजन

देश

क्रीडा

ग्लोबल

महाराष्ट्र

फोटो

आणखी

Nanded : महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण केल्याने शिक्षा

Published on : 9 September 2022, 8:14 am

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना साडे दहा वर्षांपूर्वी बोळसा (ता. उमरी) येथे मारहाण करणाऱ्या दोघांना भोकर येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश वाय. एम. एच. खरादी यांनी एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये रोख दंडांची शिक्षा ठोठावली आहे.बोळसा येथे ता. चार फेब्रुवारी २०१२ रोजी देवीची यात्रा होती. त्यानिमित्ताने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे तंत्रज्ञ पांडुरंग दत्ताराम मोरे आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते. या प्रसंगी डीपीमध्ये फ्युज टाकत असताना राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे हे दोघे आले आणि तंत्रज्ञ पांडुरंग मोरे यांना तुमच्यामुळेच लाईट गेली, असे म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत श्री मोरे यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. राघोबा जगदंबे आणि लक्ष्मण शिंदे याच्याविरुद्ध भोकरच्या जिल्हा न्यायालय येथे दोषारोप पत्र सादर झाले होते.