मुंबई : १६ सप्टेंबर रोजी देशात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. ज्या अंतर्गत लोकांना कोणत्याही मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये केवळ ७५ रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे मिळत होती. परंतु बॉलीवूड स्टार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' च्या यशाच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय थोडा पुढे ढकलला आहे.
आता १६ सप्टेंबर ऐवजी २३ सप्टेंबरला राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. देशभरातील सिनेमागृहांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. कोरोना विषाणूनंतर चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्यानंतर थिएटर प्रेक्षकांना धन्यवाद म्हणण्यासाठी खास ऑफर देत होते. पण आता मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने एक नोट जारी करून कळवले आहे की राष्ट्रीय सिनेमा दिन १६ सप्टेंबर ऐवजी २३ सप्टेंबरला साजरा केला जाईल.
तिकीट कसे बुक करावे
७५ रुपयांमध्ये सिनेमा बघण्याच्या ऑफरचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्सच्या तिकीट काउंटरला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला ७५ रुपयांमध्ये चित्रपटाचे तिकीट मिळेल. तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केल्यास तुम्हाला चित्रपटाच्या तिकिटांवरही कर भरावा लागेल. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त, प्रेक्षक PVR, INOX, Cinépolis, Carnival, Miraj, Citypride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K, Delite यासह ४००० हून अधिक मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेणार आहेत.