मतदार यादी अपडेट व अचूक असावी, याकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी आधारकार्डशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यानुसार दि.1 ऑगस्ट 2022 पासून मतदारयादी आधारकार्डशी जोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या आजपर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 46 हजार 940 मतदार आधारशी जोडण्यात आले आहेत.

      याद्या अधिकाधिक त्रूटीरहीत करण्यासाठी आता मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे.

     २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ही मोहीम पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असून मतदारांनी फॉर्म-६ ब भरून द्यावा, असे आवाहन निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी केले आहे. मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी ही मोहीम असली तरी ती ऐच्छीक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

     त्यानुसार 188 पनवेल- 34 हजार 069, 189 कर्जत- 48हजार 928, 190 उरण- 64हजार 949, 191 पेण- 38हजार 395, 192 अलिबाग-26 हजार 286, 193 श्रीवर्धन- 68 हजार947, 194 महाड- 65 हजार 366 अशा एकूण 3लाख 46 हजार 940 मतदारांनी आजपर्यंत आपले मतदार ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक केले आहे.

     जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 22 लाख 71 हजार 604इतकी आहे. निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन जास्तीत जास्त मतदार ओळखपत्र आधार लिंक करण्यावर भर देत असून यासाठी जिल्ह्यात जागोजागी स्टॉल लावण्यात आले आहेत. यासोबतच काही विशेष शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात येत असून यामध्ये आधार नोंदणीसाठी मतदारांकडून अर्ज क्रमांक 6 ब भरून घेतले जात आहेत.

रायगड जिल्ह्यात मतदान ओळ्खपत्र आधारकार्ड जोडणी उपक्रमात सर्वाधिक श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील2लाख 61हजार883 मतदारांपैकी 68हजार947 नागरिकांनी तर सर्वांत कमी अलिबाग मतदारसंघात 2लाख 88हजार 827 मतदारांपैकी फक्त 26 हजार 286 मतदारांनी सहभाग घेत जोडणी करून घेतली आहे.रायगड जिल्ह्यात एकूण मतदार 

22 लाख 71 हजार 604इतकी असुन त्यापैकी केवळ 3 लाख 46 हजार 940 मतदार आधारशी जोडणी केली त्याची टक्केवारी केवळ 15.3 टक्के एवढी असून 84.7टक्के शिल्लक आहे.मतदान ओळखपत्र हे आधार कार्ड सोबत जोडणी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहे.

दुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असण्यासारखे दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक केले जाणार आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत १०० टक्के मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्याचे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने ठेवले आहे. संबंधित मतदाराला त्याकरीता अर्ज क्र. ६ ब भारत निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे, एकाच व्यक्तिचे एकापेक्षा अधिक मतदार संघात अथवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी तपासण्यासाठी आधार क्रमांकाचे संकलन उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत समाविष्ट माहितीची पडताळणी करणे सोपे होणार आहे.

     तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येBने आपले मतदार ओळखपत्र आधारकार्ड सोबत लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे.