चोरट्यांनी कार टाकून दोन दुचाकी लांबविल्या ;थेरगाव येथील घटना
पाचोड(विजय चिडे) अज्ञात चोरट्यांनी पैठणहून चोरलेली इंडिका कार रस्त्यावर सोडून दोन दुचाक्या चोरून नेल्याची घटना पाचोड - पैठण रस्त्यावरील थेरगाव (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता.१५) मध्यरात्री घडली.
यासंबधी अधिक माहीती अशी, अज्ञात चोरटयांनी पैठण येथुन कय्यूम कुरेशी यांची घरासमोर उभी केलेली त्यांची इंडिका कार क्रमांक एम.एच. २८ व्ही. २२१८ चोरून पाचोडच्या दिशेने पोबारा केला.रस्त्या वरील राहटगाव फाट्यावर एका इसमाच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरत असतांना संबंधीत दुचाकी मालक लघुशंकेला उठला व त्याचे लक्षात ही बाब आल्याने 'त्या' इसमांत व चोरट्यात झटापट झाली.यांत चोरट्यांनी कार घेऊन पळ काढला असता ग्रामस्थांनी त्या कारवर दगडफेक केली. यांत 'त्या'कारच्या काचा फुटल्या. त्यानंतर चोरटयांनी थेरगाव गाठले व सर्वप्रथम शेख मुनीर बापु यांची घरासमोर उभी दुचाकी (क्र. एम.एच.२० इ.डी.३६६६ चोरुन त्यांचे कडील इंडिका कार शेख मुनीर यांचे घरापासुन जवळच थेरगाव - विहामांडवा रस्त्यावर सोडून पळ काढला, त्यानंतर पाचोडकडे जातांना चोरट्यांनी एस.पी. बाकलीवाल विद्यालयाजवळ असलेल्या रविंद्र चिडे यांचे घरासमोर उभी असलेली परमेश्वर गाडेकर यांच्या मालकीची दुचाकी (क्र-एम.एच.२० सी. टी.२०१६) चोरून नेली. सकाळी संबंधीत दुचाकी मालक शेतावर जाण्यासाठी दुचाकी च्या ठिकाणी गेले असता त्यांना दुचाक्या गायब दिसल्या, तर बेवारसरित्या सदर इडिका कार रस्त्यावर उभी दिसली. यासंबंधी ग्रामस्थांनी पाचोड पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. माहीती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, जमादार किशोर शिंदे, फेरोझ बरडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपुर्ण परिस्थीती जाणून घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता ; तर कय्यूम कुरेशी यांने पैठण पोलिसांत कार चोरची तक्रार दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, जमादार किशोर शिंदे, फेरोझ बरडे करीत आहे.