जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाणून घेतल्या नागराम येथील पुरपिडीतांच्या समस्या.

सिरोंचा तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा केला दौरा.

गडचिरोली(सिरोंचा) दि 31जुलै2022 : गडचिरोली जिल्यातील दक्षिणेकडच्या सिरोंचा तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आज केला. या दरम्यान त्यांनी सिरोंचा तालुक्यातील नागराम या गावाला भेट देत तेथील समस्या जाणून घेत पाठपुरावा करून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

गडचिरोली जिल्हयात मुसळधार पावसाने सिरोंचा, भामरागड, अहेरी तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले तर काहींना गावातून स्थलांतर करावे लागले. जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे नेममीच मदतिला धावून येत असतात. आज त्यांनी सिरोंचा तालुक्याचा दौरा करता अनेक गावांना भेट देत मदतही केली. दरम्यान सिरोंचा तालुक्यातील नागराम या गावात भेटे देवून तेथील पुरपीडीतांच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरात लवकर शासनाकडे मदतीकरीता पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले..!!

यावेळी उपस्थित आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,अविस जेष्ठ नेता शंकर मंदा,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडी,माजी जिप सदस्य अजय नैताम,सरपंच सूरज गावडे,सिरोंचा नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,अविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, मारोती गणापूरपूवार,किरण वेमुला, संतोष भिमकरी,अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला,सतीश जवाजी,साई मंदा, गणेश राच्चावार,दुर्गेश लांबाडी, लक्ष्मण बोल्ले,संपत गोगुला, राकेश सडमेकसाहा सिरोंचा तालुक्यातील अविसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.