हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येणार असून त्यात अनुषंगाने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरीही मराठवाड्यातील काही जिल्हे हे निजामाच्या गुलामगिरीतच होते तर अनेक शूरवीर जवानांनी निजामांसी संघर्ष करून अखेर मराठवाडा हा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी योगदान दिले असून मराठवाड्याला खऱ्या अर्थाने 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले.तसेच 17 सप्टेंबर हा मराठवाड्यातील हिंगोलीसह आठही जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो तर हिंगोली या ठिकाणी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शासकीय ध्वजारोह संपन्न होणार आहे.