बीड प्रतिनिधी

पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून यांचे तात्काळ पंचनामे करुन सरसगट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक भरपाई देण्यात यावी तसेच पिक विमा त्वरित देण्यात यावा यासह अन्य मागण्या घेत भारतीय किसान सभा आक्रमक झाली असून आज सकाळी ११ वा . बीड - परळी हायवेवर शेतकऱ्यांसोबत वडवणी येथे रस्ता रोको करत केंद्र व राज्य सरकार विरोधात तिव्र संताप व्यक्त केला आहे . - वडवणी तालुका अखिल भारतीय किसान सभा व एसएफआयच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज सकाळी ११ वा . शेतकऱ्यांना सोबत घेत भव्य असा एक तास रस्तारोको करत केंद्र व राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त करत शेतकरी मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या , पिक विमा मिळालाच पाहिजे , सरसगट ५० हजार रुपायाची मदत मिळालीच पाहिजे यासह अन्य घोषणा देण्यात आल्या . तसेच वडवणी तालुक्यात आणि विशेष कवडगांव महसुल विभागात आणि तालुक्यात ढगफुटी जन्य पाऊस झालेल्या गावांमध्ये पिकांचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा ,

पिकाचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी , तलाठी लॉगिन मध्ये आलेल्या ई - पीक पहाणी विनंत्या तात्काळ मंजूर कराव्यात जेणेकरून संबंधित पिकांचा विमा मिळण्याचा मार्ग सुकर होईल , एम . एस . पी . पी . केवळ घोषणा नको . उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त हमीभावाचा कायदा करावा , केवळ सत्ता मिळवण्यासाठीच स्वामीनाथन आयोगाचा पुळका कशाला ? आता त्याची शेतकरी हितासाठी अंमलबजावणी करावी , शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्त्यात लोटणारे आयात - निर्यात धोरण बदलून ते खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे ते करावे , संयुक्तकिसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकन्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे वापस घ्यावेत , रासायनिक खतांच्या किंमती कमी करुन खतांचा काळाबाजार थांबवा , शेती उपयोगी सर्व साहित्य जीएसटी कक्षेतून वगळून ते मोठ्या अनुदानावर व मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दयावेत , सर्व प्रलंबित पीक विम्याचे शेतकन्यांना लवकरात लवकर वाटप करावे यासह अन्य मागण्याचे निवेदन तहसिल प्रशासन देण्यात आले . यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते , पदाधिकारी तसेच एसएफआयचे कार्यकर्ते , शेतकरी , शेतकरी पुत्र मोठ्या संख्येनी उपस्थिती होते.तर या रस्तारोको वेळी वासनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या दरम्यान वडवणीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.