औरंगाबाद:- दि.१५ स.(दीपक परेराव) औरंगाबाद जिल्ह्यात युवा सेनेचे १९ व २० सप्टेंबर रोजी मेळावे होणार असून या मेळाव्यास युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे संपूर्ण जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाप्रमाणे मेळावे होणार असून हे मिळावे संघटनात्मक दृष्टिकोनातून होणार आहे. युवासेना कार्यकर्त्यांची बांधणी आणखी मजबूत करण्याचा प्रमुख उद्देश असून युवासेना पदाधिकाऱ्यांनी हे मिळावे यशस्वी करा असे आवाहन विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केले. मेळाव्यानिमित्त आयोजित पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते.

युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांचा मराठवाडा दौरा सुरू असून औरंगाबाद जिल्ह्यात १९ व २० सप्टेंबर रोजी दोन दिवसीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, या दौऱ्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचे मेळावे, युवासेना शाखा उद्घाटन, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शिवसेना संपर्क कार्यालय क्रांतीचौक या ठिकाणी युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. 

यावेळी बोलताना दानवे म्हणाले की युवा सेना पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे व मेळावे यशस्वी करण्यासाठी तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करावे त्याचप्रमाणे शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तरुण युवा युवती पक्षाचे काम करण्यास इच्छुक असून त्यांनाही मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्याचे आवाहन यावेळी दानवे यांनी केले.

यावेळी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, मच्छिंद्र देवकर, शहराधिकारी सागर खरगे,शुभम पिवळं,कैलास जाधव,स्वप्नील डिडोरे,अभिजित थोरात, रामेश्वर कोरडे, प्रकाश धुर्वे, मधुर चव्हाण,आकाश जैन,सागर भारस्कर,राहुल वाणी, दत्ता शेलार,सागर वाघचोरे,ऋषिकेश तोरणमल,योगेश ओळेकर,भूषण बकाल,नागेश थोरात, राहुल पेरे,साहिल लहाने,साईनाथ थोरवे लखन ठाकूर,दत्ता कनसे,आकाश लेंभे,राजू तायडे,गजानन राऊत,उमेश मोकासे,जिल्हा युवती अधिकारी पूजा घुगे, सानिका देवराज आधी युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.