कन्नड प्रतिनिधी ,कन्नड शहरातील युवा उद्योजक मनोज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक , धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे . आज गुरुवारी सकाळी ८ वाजता महादेवाच्या मंदिरात अभिषेक केला जाणार आहे , नंतर दर्ग्यावर चादर चढवली जाणार आहे . ११ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यासह अन्य महापुरुषांच्या पुतळ्यास व स्मारकांना अभिवादन करण्यात येणार आहे . १ वाजता कन्नड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार असून ४ वाजता हतनूर येथील आश्रमशाळेत जाऊन त्या चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . शुक्रवारी दि . १६ ) १२ वाजता राजुरेश्वर मंगल कार्यालयात प्रसिद्ध व्याख्यानकार अविनाश भारती यांचे व्याख्यान होणार आहे . शनिवारी ( दि . १७ ) चाळीसगाव रोडवरील गिरणी ग्राउंड येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहीर कीर्तन होईल . या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन मनोज पवार , महिला उद्योजिका ऊर्मिला पवार , संदेश पवार , महेश सोनवणे , मनोज देशमुख आदींनी केले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
छात्र नेता ने प्राचार्य को सौंपा परीक्षा नियंत्रक के नाम ज्ञापन
छात्र नेता हिमांशु ओझा ने बताया कि प्रथम सेमेस्टर के परीक्षा आवेदन फॉर्म भरने में आ रही कई...
Delhi-NCR में प्रदूषण से हाल बेहाल, बहुत खराब श्रेणी में बना हुआ है AQI | Delhi Pollution | Aaj Tak
Delhi-NCR में प्रदूषण से हाल बेहाल, बहुत खराब श्रेणी में बना हुआ है AQI | Delhi Pollution | Aaj Tak