सोलापूर : नेहरूनगर, मजरेवाडी, कसबे सोलापूर, या विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी विश्वरत्न सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलनात सुरुवात केली आहे.

सोलापूर शहराचे मंडल अधिकारी, नेहरूनगर व कसबे सोलापूरचे तलाठी, मजरेवाडीचे तलाठी यांचा भ्रष्टाचार व कारभार याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, सामान्य नागरिक यांचे कार्यालयात काम घेऊन गेले असता त्या ठिकाणी पैशाची मागणी केली जाते व पैसे न दिल्यास नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. 

अलीकडील तीन महिन्यात महाराष्ट्र शासन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणताही आदेश आला नाही तरी देखील हेडगिरे यांनी गुंठेवारी दस्त नोंदणी चालू ठेवली आहे. यातील संबंधित तलाठी यांनी गुंठेवारीच्या आधारे धरलेले नोंद फेरफार मंडळ अधिकारी हेडगे यांनी काही फेरफार रद्द व काही फेरफार मंजूर केले आहेत ते कशाच्या आधारे केले याची संपूर्ण चौकशी व्हावी या मागणीसाठी विश्वरत्न सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी दिली.