साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन...

बिडकिन प्रतिनिधी:- 

आज दि.१४ रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे समाजबांधवांच्या वतीने प्रतिमा पुजन करण्यात आले.आज १४ सप्टेंबर रोजी रशियाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी मॉस्को शहरातील शासकीय वाचनालयात पुतळा उभारला जाणार असुन तैलचित्राचे अनावरण हि केले जाणार आहे.यावेळी बिडकिन येथे मातंग समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे,पत्रकार रविंद्र गायकवाड,अंकुश अवचिंदे,विजय शिंदे, कोतवाल किशोर अवचिंदे,योसेफ अवचिंदे, अनिल शिंदे,अजय आघाम ,संजय शिंदे,जीवन मिसाळ,दिपक अवचिंदे, प्रविण चव्हाण,निसार शेख, जयराम गायकवाड, प्रदिप शिंदे, राहुल जाधव, नितीन मोरे,पप्पु पवार, रोहित अवचिंदे, राकेश शिंदे आदींसह बिडकिन व परिसरातील समाजबांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती..

यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोष करत अभिवादन पर रमेश शिंदे यांनी रशियात होणारे कार्यक्रम संबंधित माहिती दिली...

पैठण तालुक्यातील ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रविंद्र गायकवाड, बिडकिन