आज जिंतुर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळाला.तसेच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मा.आ. विजयराव भांबळे साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व तालुका पदाधिकारी मुख्य कार्यकर्ते तसेच तालुक्यातील सर्व बूथ कमेटीचे सदस्य गाव पातळीवरील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार गावागावात घेऊन जा; सभासद नोंदणी अभियानाच्या उद्घाटनानिमित्त विजयराव भांबळे साहेबांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले!

जिंतूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाच्या सभासद नोंदणीची सुरुवात झाली. यानिमित्ताने उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना तळागाळातील नागरिकांच्या उत्थानासाठी झाली. आपण सर्वांनी सामाजिक जीवनात काम करत असताना शेवटच्या थरापर्यंत जाऊन वंचित पददलीत माणसासाठी काम केले पाहिजे. 

"दिल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास साहेब उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेबांनी माझ्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पक्ष नेतृत्वाची धुरा सोपवली आहे व सभासद नोंदणीचे आवाहन केले आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात घेऊन जाण्यासाठी व पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार घराघरात घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील रहावे!