सेलू शहरात एका अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सेलू पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी शहरात बुधवार 14 सप्टेंबरपासून दामिनी पथक नियुक्त केले आहे.
महिला असो किंवा शाळकरी मुली यांना रोडरोमियोंचा त्रास होवू नये, तसेच सेलू शहरात घडलेल्या अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये तसेच गुन्हेगारीला आळा बसावा या करीता या पथकाची स्थापना करण्यात आली असून ज्या महिला, भगिनी, युवतींना रोडरोमिओंचा त्रास होत असेल त्यांनी त्वरीत या पथकातील अधिकार्यांशी संपर्क साधावा, जेणेकरून अश्या समाजविघातक इसमांचा पोलिसांना बंदोबस्त करणे सोयीस्कर होईल. त्यासाठी दक्ष नागरीकांनीही दामिनी पथकास त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन सेलू पोलिस प्रसाशनाद्वारे करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरीकांनी पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी, मो.9359428441, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर चौरे मो.9146359382, पोलिस हवालदार सरीता कड मो.9881144670, पोलिस नाईक राहुल मोरे मो. 8805013580, पोलिस शिपाई संजय सानप, मो.9604535698, पोलिस शिपाई सुनिता व्यवहारे मो.9022914311 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सेलू पोलिस प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.