जालना : जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद या दोन तालुक्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसापासून जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाला. या आलेल्या पावसामध्ये काहीसा फायदा जरी झाला असला मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने भोकरदन तालुक्यातील धावडा, वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, वडोद तांगडा, लिहा, शेलु द, पोखरी, मेहगाव आधी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे या जोरदार वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता तोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या प्रलयाने हिसकावून घेतला आहे, यामध्ये मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता काढणीला आलेला मक्का हा जमीन दोस्त झाला आहे. अगोदरच काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. यावेळी हे पिके वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागली व पिके चांगली सुद्धा आली यामध्ये काही दिवसांवर ते काढणीला येणार तोच या निसर्गाने पुन्हा आपली बाजू पलटली व प्रलयाने पूर्ण होत्याचं नव्हतं केल्याचे चित्र भोकरदन तालुक्यात पाहायला मिळत आहे.तरी या सर्व नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी कृषी विभागाला संपर्क केला असता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान या वादळी वाऱ्यामध्ये व पावसात झाले आहे. त्या शेतकऱ्यांनी पिक विमा जर काढेल असाल तर त्यांनी या नुकसानीची तक्रार ऑनलाईन पीक विमा कंपनीच्या साईडवर करावी व जसे शासकीय आदेश कृषी विभागाला प्राप्त होतील तसे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य देऊन न्याय दिला जाईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.