१७ सप्टेंबरला वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर मेळाव्यास उपस्थित राहणार.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बीड (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे सक्षम व कृतीशील राजकीय संघटन निर्माण करून वंचित समूहांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांना पक्षात नवनव्या जबाबदाऱ्या देऊन,बीड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात संघटन बांधणी करण्यासाठीच्या उद्देशाने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन १७ सप्टेंबर शनिवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात दुपारी १२ वाजता करण्यात आले असल्याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. गणेश खेमाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या कार्यकर्ता मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे सह राज्य प्रवक्ता फारुख अहमद,राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे,महिला आघाडीच्या राज्य महासचिव अरुंधतीताई शिरसाट बीड जिल्हा प्रभारी तथा राज्य उपाध्यक्ष किशन चव्हाण,मराठवाडा अध्यक्ष अशोक (भाऊ) हिंगे,जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या भव्य कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संघटक धमानंद साळवे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड, मेजर अनुरथ वीर,पुरुषोत्तम वीर,ज्ञानेश्वर कवठेकर,दगडू दादा गायकवाड, सुदेश पोतदार,अंकुश जाधव,भारत तांगडे,बबनराव वडमारे,अजय सरवदे,सेवानिवृत्त तहसीलदार आनंद सरवदे,भीमराव चव्हाण,बालाजी जगतकर, शेख युनुस,सोनाजी सोनवणे,चंद्रकांत अवसरमल,पुष्पाताई तुरुकमारे यांनी केले.