उदगीर येथील नगरपरिषदेचे तीन वेळा नियोजन व विकास सभापती राहिलेले राष्ट्रीय दलित अधिकार मंच प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी वृक्षारोपण ही करण्यात आले या वृक्षाचे संगोपन व्हावे यासाठी विशेष काळजी घेतली जावी म्हणून तोंडार पाटी येथील शेतीच्या बाजूला काटेरी कुंपण लावण्यात आले आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना अंबरखाने रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र ही देण्यात आले सद्यस्थितीत रक्तदानाचे अत्यंत महत्त्वाचे समाजातील कोणत्याही घटकांसाठी अपघाताच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी रक्तदान कामाला येते असे सांगताना युवा नेते रवी जवळे यांनी स्पष्ट केले रक्तदानाच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव ही भावना निर्माण होते आणि यातून राष्ट्रीय एकात्मता जपली जाते या उदात्य हेतूने राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांच्या वाढदिवसानिमित्त युवानी त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून वाढदिवस साजरा केला तसेच प्रति वर्षाप्रमाणे उदगीर शहरातील सिद्धार्थनगर फुलेनगर चंद्रमादेवी नगर किल्ला गल्ली गोविंद नगर म्हाडा कॉलनी या भागातील उत्साही कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ सोसायटी येथे नागरिकांसाठी भोजनाची सोय केली होती निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे ) यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एम आय एम चे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते यामध्ये प्राधान्याने  जागीरदार माजी नगरसेवक साबीर पटेल बाबरभाई यांच्यासह मौलाना आणि इतर अनेक धर्मगुरू व समाजातील सन्माननीय उपस्थित होते सर्वप्रथम बनते यांनी पंचशील आणि त्रिसरण घेऊन बुद्धवंदना घेतली तदनंतर विविध राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी  निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांच्यावर जणू शुभेच्छांचा वर्षावच केला.