आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धेचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन विविध कला आविष्कार सादर करणाऱ्यांचे स्थान अग्रस्थान सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार*मुंबई, विविध कला सादर करून समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम कलाकार मंडळी करत असतात. त्यामुळेच या कलाकारांचे स्थान अग्रस्थानी असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.४९ आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आज करण्यात आले. यावेळी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे, इंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन (ईप्टा) अर्थात भारतीय जननाय संघाच्या अध्यक्षा सुलभा आर्या, जनरल सेक्रेटरी मसुद अख्तर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव, रमेश तलवार, सचिन निंबाळकर यांच्यासह या नाट्य स्पर्धेत भाग घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, कला आविष्कार सादर करून समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे कठीण काम कलाकार मंडळी करतात. कोणत्याही कलाकाराला आपण सादर केलेल्या कलेतून आनंद मिळाला तरच त्याची कला सगळ्यांपर्यंत पोहचेल. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आजच्या या नवीन कलाकारांनी आपापल्या कलेत स्वतःला वाहून घेऊन काम करावे. विद्यार्थ्यांनी जे काही करायचे ते ईश्वराची अर्चना समजून करावे, कलाकारांनी कलाविष्कारही ईश्वराची अर्चना समजून करावे असेही यावेळी सांगितले. इंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन (ईप्टा) अर्थात भारतीय जननाय संघ गेले अनेक वर्षे नाट्य स्पर्धा आयोजित करून नवीन कलाकार तयार करीत आहे याचा आनंद आहे. सांस्कृतिक कार्य विभाग अशा संस्थांच्या मागे उभी असून भविष्यातील आपल्या उपक्रमांना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Protikhya by Nibir Palash and Jyotishman (Assamese Sad Poem)
Protikhya by Nibir Palash and Jyotishman chakravorty Assamese Sad Poem .
G20 Summit: Droupadi Murmu का रात्रिभोज, Cabinet, राज्य मंत्रियों समेत कई विपक्षी CMs को न्योता
G20 Summit: Droupadi Murmu का रात्रिभोज, Cabinet, राज्य मंत्रियों समेत कई विपक्षी CMs को न्योता
Indian Banks can isuue Rupay prepaid forex cards : RBI Governor
Indian Banks can issue Rupay prepaid for ex cards : RBI Governor
બોર્ડના પરિક્ષાર્થીઓને 'ગુલાબના ફૂલ' અર્પી આવકાર્યા !
ધોરણ ૧૦ અને ૧૨ના વિદ્યાર્થીઓની પરીક્ષા માટે ખંભાતમાં અલગ અલગ પરીક્ષા કેન્દ્રો પર પરીક્ષાનો...
Israel की चेतावनी Hezbollah के हथियार भंडार के क़रीब रहने वाले लोग तुरंत निकल जाएं... (BBC)
Israel की चेतावनी Hezbollah के हथियार भंडार के क़रीब रहने वाले लोग तुरंत निकल जाएं... (BBC)