पाथरी:-विधानसभा मतदार संघाचे सलग तीन वेळा प्रतिनधित्व केलेले शिवसेनेचे माजी आ हरीभाऊ लहाने यांनी शिवसेना शिंदे गटात सोमवारी १२ सप्टेबर रोजी पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह प्रवेश केला.
या वेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे,माजी मंत्री अर्जून खोतकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आ हरीभाऊ लहाने यांचे भगवी शाल देऊन स्वागत केले. या वेळी माजी आ लहाने यांचे सेलू,पाथरी,सोनपेठ तालुक्यातील शंभरावर समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन आशोकराव गिराम यांनी दिली.