पाथरी ( प्रतिनीधी :)-शहरातून सेलू कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८बी ची अवस्था अतिषय दयनिय झाल्याने ९ सप्टेबर शुक्रवार रोजी मोलॅसीस घेऊन जाणारा टँकर बोरगव्हाण जवळ महामार्गावरील मोठ्या खड्डयात रुतुन बसला होता. या विषयी माध्यमांनी आवाज उठवताच या महामार्गावर साचलेले पाणी काढून जेसीबी मशीन च्या साह्याने डागडूजीच्या कामाला संबंधिताने मंगळवार पासुन सूरूवात केली असल्याची माहिती सिद्धेश्वर इंगळे यांनी दिली.दि.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
९ सप्टेबर रोजी पाथरी-सेलू राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ८ वा. मोलॅसिस घेऊन जाणारा टँकर फसला होता या दिवशी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू असल्याने या महामार्गावरील वाहतुक दुपारी तीन वाजेपर्यंत ठप्प झाली होती.बोरगव्हाण येथील सिद्धेश्वर इंगळे आणि काही ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेत दोन जेसीबी मशिन आणि एका ट्रॅक्टरच्या साह्याने खड्या बाहेर काढले होते. या विषयी आणि माध्यमांनी वृत्त प्रकाशित केले होते.याची दखल घेत मंगळवारी या राष्ट्रीय महामार्गावरील खड्यात साठलेले पाणी जेसीबी मशीन च्या साह्याने काढून टाकण्याचे काम संबंधीत ठेकेदारा कडून सुरू झाले असल्याची माहिती सिद्धेश्वर इंगळे यांनी माध्यमांचे आभार मानले.