जप्त केलेल्या मालमत्तेवर अस्तित्वात नसलेली सुरक्षा एजन्सी नेमल्याचे दाखवून त्यांच्या पगारापोटी बँकेकडून पैसे घेतले. त्याचवेळी जप्त केलेल्या कंपनीतील मालमत्तेची विल्हेवाट लावून तब्बल २ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाच्या तात्कालीन मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
याबाबत युनियन बँक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक ग्यानेंद्रकुमार शिवकुमार सिंग (रा. मुंबई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४९६/२२) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी अनिलकुमार सिंग (रा. गोकुळ विहार कॉम्प्लेक्स, मुुंबई) आणि संचालक शिवशक्ती असोसिएट (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० जानेवारी ते २८ ऑगस्ट २०२२ दरम्यान अष्टापूर येथील पुणे ट्युब मॅन्युफॅक्चरिंग प्रा़ लि़ या कंपनीत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग हे युनियन बँक ऑफ इंडिया अॅसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच मुंबई येथे सहायक व्यवस्थापक आहेत. बँकेने अतुल दुधे यांच्या पुणे ट्युब मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला कर्ज दिले होते. त्यांचा लोखंडी पाईप बनविण्याचा कारखाना आहे. कर्ज न फेडल्यामुळे तारण मालमत्ता म्हणून बँकेचे पूर्व व्यवस्थापक अनिलकुमार सिंग यांनी कारखाना सील केला. बँकेच्या सुरक्षा एजन्सी नियुक्त करण्याचे धोरणाकडे दुर्लक्ष करुन कर्तव्यास हयगय केली. शिवशक्ती सुरक्षा असोशिएट मुंबई या खासगी सुरक्षा एजन्सीकडे लायसन्स नसताना कर्ज तारण मालमत्ता त्यांच्या ताब्यात दिली. कायमस्वरुप तीन सुरक्षा रक्षक नेमणूक केल्याचे दाखवून त्यांचा पगार बँकेमार्फत दिला.
फिर्यादी ग्यानेंद्रकुमार यांनी कंपनीला भेट दिली असता तेथे साध्या वेशातील सुरक्षा रक्षक होते.कंपनीतील मशीनरी चोरीला गेली असल्याचे त्यांना आढळून आले.त्यांनी चौकशी केल्यावर अशी नोंदणीकृत सुरक्षा एजन्सी नसल्याचे आढळून आले.त्यामुळे २ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांची मालमत्तेचा अपहार होण्यास कारणीभूत ठरल्यावरुन अनिलकुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.