मुंबई: आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत एका अल्पवयीन तरुणीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला वर्सोवा पोलिसांनी अटक केली असुन पीडितेनं नुकतंच तिच्या आई-वडिलांसमोर हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर ही घटना समोर आली. रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी केल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी ही पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे.

याप्रकरणी एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये नोकरी करणाऱ्या 58 वर्षीय अंधेरीतील रहिवाशाला रविवारी अटक करण्यात आली. असुन या व्यक्तीने 2019 पासून (मुलगी अल्पवयीन असतानापासून) एका 19 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तक्रारीत पीडितेनं म्हटलं आहे की "आरोपीने दावा केला की त्याच्याकडे दैवी शक्ती आहे आणि त्याने मला त्याच्या घरी बोलावलं. त्याने मला प्रसाद दिला आणि 2019 मध्ये पहिल्यांदा माझ्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर आरोपी पीडितेला फोन करायचा आणि म्हणायचा की त्याला नाराज केल्याबद्दल तिला शाप भोगावा लागेल. त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि तिचे नग्न फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल केलं. सततच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने अखेर या संपूर्ण घटनेबद्दल आपल्या पालकांना माहिती दिली. यानंतर ही घटना उघडकीस आली..

वर्सोवा पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार यांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीच्या अटकेची पुष्टी केली. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली असून आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केलं गेलं.