कदमवाकवस्ती : पूर्व हवेली परिसरात सध्या अन्न व औषध प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, बेकरी,दुकानदार,खाद्यपदार्थ उत्पादक आणि दूध विक्रेते यांच्याकडून नियम धाब्यावर बसवत मनमानी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.हॉटेल व्यवसायिकांकडे अन्न व औषध विभागाचा परवाना देखील नसून खाद्य बनवण्यासाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत आहे तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचा धोका आहे.पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती परिसरात विविध खाद्यपदार्थ तयार करणारे, दुकाने, हॉटेल यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कोरोना संसर्गाच्या काळापासून लोक खाद्यपदार्थ, आरोग्य याबाबतीत खूपच दक्ष झाले आहेत. आजारी पडू नये यासाठी ताजे व चांगले पदार्थ खाण्यावर लोकांचा भर आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तपासणीची मोहीम सुरू करणे गरजेचे आहे. खाद्यपदार्थ उत्पादक कारखाने, तेल निर्मिती कारखाने, हॉटेल, बेकरी यांच्यावर तपास करण्याची गरज आहे. परंतु कोणत्याही प्रकारची तपासणीच नसल्याने बेकरी, हॉटेल, दुकानचालक, विविध खाद्यपदार्थ उत्पादकही बिनधास्त झाले आहेत. अनेक बेकरींमध्ये विक्री होत असलेल्या उत्पादनांवर उत्पादन, एक्स्पायरीची तारीख दिसून येत नाही. त्यांना विचारले तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. हॉटेल, बेकरीत अनेक कर्मचारी स्वच्छता ठेवत नाहीत.मास्कचाही वापर करीत नाहीत. अनेक ठिकाणी स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणीत आणि कारवाईत सातत्य ठेवावे,अशी लोकांची अपेक्षा आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं